शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

घनकचरा प्रकल्पासाठी १७.३५ कोटी भरा

By admin | Published: February 17, 2016 11:12 PM

हरित न्यायालयाचे आदेश : २८ मार्चला होणार अंतिम सुनावणी

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी १७ कोटी ३५ लाख रुपये विभागीय आयुक्तांकडे भरण्याचे आदेश हरित न्यायालयाने बुधवारी महापालिकेला दिले. ही रक्कम तीन हप्त्यात नऊ महिन्यांच्या आत भरावी लागणार आहे. दरम्यान, घनकचरा प्रकल्पाबाबत २८ मार्चला न्यायालयात अंतिम निर्णय होणार आहे.महापालिका घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात पालिका अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकल्पासाठी न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे ६० कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. पालिकेने आजअखेर टप्प्या-टप्प्याने २६ कोटी ५१ लाख रुपये भरले आहेत.हरित न्यायालयाने महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शॉर्ट व लाँग टर्म उपाययोजना करण्यास सुचवले. लाँग टर्ममध्ये तज्ज्ञ समितीने सुचवलेला प्रकल्प, तर शॉर्ट टर्मसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला ७ कोटी २६ लाखांचा आराखडा आहे. यात कचरा डेपोमध्ये अंतर्गत रस्ते करणे, संरक्षक भिंत बांधणे, आगप्रतिबंधक यंत्रणा उभी करणे, सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपाययोजनांचा समावेश होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीनेही एक कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच तज्ज्ञ समितीने साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ९ कोटी ४६ लाखांचा शॉर्ट टर्म आराखडा दिला आहे.दोन्ही आराखडे एकत्रित केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची किंमत ४३ कोटी ८६ लाखांवर गेली आहे. ही बाब महापालिकेने हरित न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यात शासनाकडून ७० टक्के अनुदान मिळणार आहे. उर्वरित ३० टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम यापूर्वीच महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे जमा केली आहे. त्यामुळे ६० कोटी रुपये भरण्याचा आदेश मागे घ्यावा, अशी विनंती पालिकेने केली, पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. मात्र ६० कोटी नको, तर ४६ कोटी ८६ लाख रुपये भरावेत, असे आदेश दिले. यापूर्वी भरलेली रक्कम यातून कमी करण्यास सांगितले. येत्या नऊ महिन्यात तीन हप्त्यात ही रक्कम भरावी, तसेच २८ मार्चला घनकचराप्रकरणी अंतिम सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले, अशी माहिती उपायुक्त सुनील पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)