शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By admin | Published: January 10, 2017 11:20 PM

माळवाडी घटनेचा निषेध : ग्रामीण भागात कडकडीत; १३ जण ताब्यात

सांगली : माळवाडी-भिलवडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या सांगली जिल्हा बंदला शहरात संमिश्र, तर ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सांगलीत मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध फेरी काढताना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोपावरून शहर पोलिसांनी १३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यात माळवाडीमध्ये आठवीत शिकणारी मुलगी आईशी भांडण झाल्याने रात्री घरातून निघून गेली होती. ती रात्रभर घरी परतली नव्हती. दुसऱ्या दिवशी तिचा गावातच पलूस-तासगाव रस्त्यावरील धान्य गोदामाजवळ मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन तपासणीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी बंद, निषेध मोर्चे निघाले. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्याला शहरात संमिश्र, तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकऱ्यांनी सकाळी अकरा वाजता सांगली शहरातून निषेध फेरी काढून बंदचे आवाहन केले. राम मंदिर चौक, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, तानाजी चौक, कर्नाळ रस्ता, बालाजी चौक, हरभट रस्ता, शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता या मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. दुपारपर्यंत सर्व पेठ बंद होती. बंदचे आवाहन करताना कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप करून शहर व विश्रामबाग पोलिसांनी अनंत रामचंद्र सावंत (वय २८, रा. उत्तर शिवाजीनगर), योगेश प्रकाश सूर्यवंशी (२७, वखारभाग), प्रशांत शंकर भोसले (३४, पंचशीलनगर, सांगली) यांच्यासह १३ जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना दुपारी ताकीद देऊन सोडून देण्यात आले. यामध्ये महिला, तरुण व तरुणींचा समावेश होता. सायंकाळनंतर शहरातील व्यवहार सुरळीत सुरु झाले. शहर परिसरातील माधवनगरसह अन्य गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. (प्रतिनिधी)जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसादजिल्ह्यात इस्लामपूर, विटा, खानापूर, शिराळा, आटपाडी, जत, आष्टा, कुंडल, माधवनगर, बुधगाव, दिघंची, खंडेराजुरी, ढालगाव, मिरज, बेडग, नरवाड, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव या गावांत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी निषेध फेरी काढून बंदचे आवाहन केले जात होते. मुलीवर अत्याचार व तिचा खून करणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.