ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.१० - माळवाडी (ता. पलूस) येथील १४ वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून करणाºया संशयितांना तातडीने अटक करावी, तसेच या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या सांगली जिल्हा ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातून निषेध फेरी काढताना हुल्लडबाजी केल्याचा आरोप करुन शहर पोलिसांनी १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
गेल्या आठवड्यात माळवाडीत आठवीत शिकणारी मुलगी नवीन कपडे घालण्यावरुन आईशी भांडण झाल्याने रात्री घरातून निघून गेली होती. ती रात्रभर घरी परतली नव्हती. दुसºयादिवशी तिचा गावातच पलूस-तासगाव रस्त्यावरील एका धान्य गोदामाजवळ मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन तपासणीत तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटननेचे जिल्हाभर तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी बंद, निषेध मोर्चे निघाले. या पार्श्वभूमिवर मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी जिल्हा ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याला शहरात संमिश्र, तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होते. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकºयांनी सकाळी अकरा वाजता शहरातून निषेध फेरी काढून ‘बंद’चे आवाहन केले.
राम मंदिर चौक, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन, आझाद चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, तानाजी चौक, कर्नाळ रस्ता, बालाजी चौक, हरभट रस्ता शिवाजी मंडई, मुख्य बसस्थानक परिसर, आंबेडकर रस्ता या मार्गावरुन निषेध फेरी काढण्यात आली. पदाधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद अनेक व्यापा-यांनी दुकाने बंद केली. बंदचे आवाहन करताना कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप करुन पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये महिला, तरुण व तरुणींचा समावेश आहे. शहर परिसरातील माधवनगरसह अन्य गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक गावांनी घटना घडल्यानंतर निषेध म्हणून गाव बंद केले होते. त्यामुळे या गावांनी आजच्या बंदमध्ये सहभागी घेतला नाही. भिलवडी व माळवाडी ही गावेही बंदमध्ये सहभागी झाली नव्हती. बंदच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. साध्या वेशातील पोलिस शहरात गस्त घालत होते. प्रत्येक चौकात पोलिसांचा ‘फिक्स पार्इंट’ नेमण्यात आला होता.