शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप, विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:00 PM

विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली.

ठळक मुद्दे​पुढील महिन्यापासून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे : शशिकांत बोराटे सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

सांगली : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप शनिवारी झाला. त्यावेळी बोराटे बोलत होते.

पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास निवासी उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे, राज्य परिवहन महामंडळाच्या सांगलीच्या आगाराच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, आरटीओ निरीक्षक रमेश सातपूतेश वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम, उपनिरीक्षक बाळासाहेब माळी उपस्थित होते.बोराटे म्हणाले, प्रत्येक वाहनधारकाने रस्त्यावर वाहतूक नियमांचे पालक केले पाहिजे. देशात दररोज चारशे लोकांचा अपघातात बळी जात आहे. शाळकरी मुले ही देशाची भावी पिढी आहे. मुले आतापासूनच वाहन चालविताना दिसतात. पण त्यांना वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मुलांनाही त्यांच्या पालकांना वाहतूक नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.

पालक दुचाकीवरुन जात असतील तर त्यांना हेल्मेट घालण्यास सांगितले पाहिजे. पोलीस मुख्यालयात अत्याधुनियक ट्राफीक पार्क उभारण्याचे काम सुरु झाले आहे.

या पार्कमध्ये पुढील महिन्यापासून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले जातील. यासाठी आरएसपीची मदत घेतली जाईल. वाहतूक नियमांचे शिक्षक हा महत्वाची बाब बनली आहे. हे नियम विद्यार्थ्यांनी आतापासूनच अंगीकारले पाहिजेत.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, वाहनधारकांनी स्वत:सह दुसऱ्याची सुरक्षितता धोक्यात आणू नये. वाहन चालविताना वेगानवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वाहतूक नियम तोडला आणि पोलिसांनी पकडले तर आपली चूक मोठ्या मनाने कबूल करुन शासकीय दंड आनंदाने भरावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ऊन, वारा व पाऊस झेलून काम करणाऱ्या वाहतूक यंत्रणेला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. लायसन्स काढताना शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नये. अपघातग्रस्तांना मदत करावी.सहाय्यक निरीक्षक अतुल निकम यांनी स्वागत व प्रास्तविक केले. उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी रिक्षा संघटनेचे नेते फिरोज मुल्ला, महेश चौगुले यांच्यासह शाळकरी मुले, आरएसपीचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवादअतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला. वाहतूक नियमांविषयी प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी काही प्रश्नांची उत्तरे बरोबर, तर काही चुकीची दिली. चुकीच्या उत्तराबाबत बोराटे यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावरुन चालताना कोणत्या बाजूने चालावे, वाहन कोणत्या बाजूने चालवने, यासह अनेक प्रश्ने विचारली. ​

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSangliसांगली