फोटो ओळ - कारंदवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू साखर काखान्याच्या युनिटमध्ये गाळप हंगाम सांगता समारंभात ऊसतोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार व अधिकाऱ्यांचा एल. बी. माळी यांनी सत्कार केला. यावेळी विजयबापू पाटील, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, प्रदीपकुमार पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : कोरोना संकटामुळे इतर क्षेत्राप्रमाणे साखर उद्योगही संकटांचा सामना करीत आहे. तरीही राजारामबापू कारखाना कारंदवाडी युनिटमध्ये तीन लाख ८३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. हे सांघिक कष्टाचे फळ आहे, असा विश्वास ज्येष्ठ संचालक, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी एल. बी. माळी यांनी व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटच्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, माणिक शेळके, प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे उपस्थित होते.
एल. बी. माळी म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपण कारंदवाडी युनिटमध्ये १३४ दिवसांत ३ लाख ८३ हजार ६५३ टन उसाचे गाळप केले. यात ४ लाख ८८ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १२.७० टक्के इतका मिळाला आहे.
विजयबापू पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात काही शेतकऱ्यांनी आपला ऊस इतरत्र दिला आहे. अन्यथा आपल्या या युनिटचे गाळप निश्चितच वाढले असते.
संचालक श्रेणिक कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक विराज शिंदे यांनी आभार मानले.
नगरसेवक विजय मोरे, दीपक मेथे, विजय मोरे, प्रशांत पाटील, व्ही. बी. पाटील, रणजित पाटील, उमेश पाटील, संग्राम पाटील, श्रीधर चव्हाण, बाबासाहेब चौगुले, सुशील भंडारे, सुधाकर पाटील, प्रताप गुरव उपस्थित होते.