शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

आटपाडीत पाणी वितरणावरून संभ्रमावस्था

By admin | Published: June 22, 2016 11:12 PM

टेंभूचे पाणी : कडेगाव, सांगोला तालुक्यांनाच फायदा अधिक, दुसरीकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ :: लोकमत विशेष

अविनाश बाड -- आटपाडी -बहुचर्चित टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी परिस्थितीत आटपाडी तालुक्याला मिळाले खरे, पण ते किती मिळाले, याबाबत आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणेच नेते आकडेवारी सांगत आहेत. त्यामुळे आटपाडीकरांच्या जिवाशी कोण खेळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ कडेगाव आणि सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठ्या प्रमाणात झाला. या दोन्ही तालुक्यात पाटबंधारे विभागाने या योजनेचे तलावांमध्ये आलेले पाणी उपसा करण्यासाठी अधिकृत परवाने दिले आहेत. पण ज्या आटपाडीत ही योजना होण्यासाठी कर्जरोखे विक्रीचा कार्यक्रम झाला आणि ज्या आटपाडीत गेली २४ वर्षे पाणी संघर्ष परिषद आयोजित केली जाते, त्याच आटपाडीतील शेतकऱ्यांना सांगोल्याकडे जाणारे पाणी बघत बसण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे विभाग परवाने देत नाही, हे समजणे कठीण आहे. परवाने नसल्यामुळे अधिच अडचणीत सापडलेले शेतकरी ३३ हजार रुपये द. ल. घ. फूट एवढ्या महागड्या दराने पाणीपट्टी कशी भरणार, कुठून भरणार अािण का भरणार, हे प्रश्न ना टेंभूच्या अभियंत्यांना पडले ना नेत्यांना!त्यात आता आमदार अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या माहितीप्रमाणेच आपण आकडेवारी सांगत असल्याचा दावा करून लोकांना संभ्रमात टाकले आहे. आटपाडीचे पाटबंधारे कार्यालय आटपाडीपासून सुमारे तीन किलोमीटरवर आहे. त्याचे प्रमुख अभियंते आर. एस. पवार यांच्याकडे अनेक ठिकाणचा पदभार असल्याने ते कार्यालयात भेटणे दुर्मिळ ठरत आहे. त्यातूनही त्यांनी शेतकऱ्यांकडून तलावातून पाणी उचलण्यासाठी पैसे भरून घेतले, पण परवाने मात्र दिले नाहीत. गरज केवळ पाण्याच्या नियोजनाचीआटपाडी तालुक्याची नैसर्गिक रचनाच पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरती आहे. त्यामुळे दिघंची-राजेवाडी परिसर वगळता सर्व तलाव सध्या टेंभूच्या पाण्याने भरता येऊ शकतात. तसे नियोजन केले, तर या तलावातून वैयक्तिक आणि सामूहिक ठिबक सिंचन शेती करून हजारो हेक्टर शेती बारमाही बागायती होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. खात्रीने पाणी मिळाले तर शेतकरी नक्की आधी पैसे भरण्यास तयारही आहेत. गरज आहे ती फक्त पाटबंधारे विभागाने नियोजन करण्याची.राजेंद्रआण्णाचे खरे, की अनिलभाऊंचे?पाटबंधारे विभागाने दिलेली माहितीच जाहीर करत असल्याचा दावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर अािण माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या दोन नेत्यांच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. राजेंद्रअण्णा आटपाडी तालुक्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत, तर आ. बाबर टेंभूचे जादा पाणी दिल्याचे सांगत आहेत. या दोन नेत्यांतील खरी माहिती कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगोला तालुक्याने पहिल्यांदा १ कोटी २७ लाख रुपये आणि पुन्हा ७५ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. आटपाडी तालुक्यात ६३ लाख १४ हजार भरले. जेवढे पैसे भरले त्यापेक्षा अधिक पाणी आटपाडी तालुक्याला दिले आहे. २५१ द. ल. घ. फूट पाणी दिले आहे. पाणी बंद झाल्यावर हे जागे कसे झाले? त्यावेळी माझ्याशी संपर्क साधला असता तर व्यवस्था केली असती.- अनिल बाबर, आमदारसांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले. १२० दिवस या योजनेचे पाणी तिकडे सोडण्यात आले. आटपाडी तालुक्याने ५७ लाख ५७ हजार भरले. २० दिवस पाणी दिले गेले. फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन आटपाडी तालुक्यावर अन्याय केला आहे. किती पाणी तालुक्याला दिले, याचे पाटबंधारे विभागाचे आपल्याकडे पत्र आहे.- राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार१९७२ मध्ये बाबासाहेब देशमुखांनी तालुक्यात सर्वत्र तलाव, पाझर तलाव बांधले. हे फक्त टेंभूच्या पाण्याने भरले तरी शेतकरी पाणी उचलून १२ ते १५ हजार हेक्टरपर्यंत बागायत करतील. पण कडेगाव आणि सांगोला तालुक्यात जसे टेंभूच्या पाण्याचे उचलपरवाने शेतकऱ्यांना दिले जातात, तसे परवाने आटपाडी तालुक्यात दिले जात नाहीत. यामागे राजकारण आहे. विरोधक आडकाठी घालत आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली