सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी सदस्यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केली.
आवर्तनाचे वेळापत्रक शेतकºयांना कळविण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांच्या शेती पंपाची सर्व बिले माफ करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. समितीची सभा अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
म्हैसाळ सिंचन योजनेची पाणी सुरु होण्याची व बंद होण्याची वेळ निश्चित नाही. या कारणांनी शेतकºयांना पिकाचे व पुढील कामाचे नियोजन करता येत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी येत असल्याचे सदस्य चंद्रकांत पाटील यांनी मांडले. पाण्याच्या आवर्तनाबद्दल नियोजन नसल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांनी याबाबत योग्य ती उपाययोजना करून आवर्तनाचे वेळापत्रक कळवावे, अशा सूचना अध्यक्ष देशमुख यांनी दिल्या.
कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाºया शेततळी काढण्यात येतात. मात्र त्यासाठी लागणारा कागद खरेदीसाठीचे अनुदान लवकर मिळत नसल्याने शेतकºयांची अडचण होती. अनुदानाची वाट पाहत कागद घालण्याचे काम व पाण्याचे पुढील नियोजन विस्कळीत होते. त्यामुळे शेतकºयांना कागद खरेदीस मंजुरी देण्यात यावी. ज्यावेळी अनुदान येईल. त्यावेळी अनुदान देताना कागद खरेदीची बिलांची खात्री करून अनुदान द्यावे. कागद खरेदी केली का नाही, याची जरूर पाहणी करावी, कागदपत्रांचा मेळ घालावा, मात्र त्यासाठी अडवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकºयांना कागद खरेदीस मंजुरी मिळावी, असा ठराव करण्यात आला.बंधाºयाच्या अंदाजपत्रकात चुका नकोत
कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यामधून साठविण्यात येणाºया पाण्याची क्षमता, त्यापासून ओलिताखाली येणाºया जमिनीचे क्षेत्र याचा विचार करून अंदाजपत्रक करण्यात यावे. अंदाजपत्रक योग्य पध्दतीने करावे, त्यामध्ये कोणत्याही चुका नकोत, अशा सूचना संग्रामसिंह देशमुख यांनी अधिकाºयांना दिल्या.