शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

काँग्रेसचा सांगलीत हल्लाबोल

By admin | Published: July 09, 2015 11:34 PM

मोर्चा, सभांमधून शासनाचा निषेध : तालुकानिहाय जनजागृतीचा निर्धार

सांगली : शासनाच्या अनेक धोरणांचा निषेध करीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगलीत मोर्चा काढला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत कॉँग्रेस नेत्यांनी शासनाच्या निर्णयांवर हल्लाबोल केला. सरकारविरोधात तालुकानिहाय जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी सभेत करण्यात आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेस भवनपासून दुपारी साडेबारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले की, या सरकारला वेळीच रोखले नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी संकटात सापडतील. त्यामुळे आपल्या शेतकरी व कष्टकरी बांधवांना कॉँग्रेसनेच आधार दिला पाहिजे. जातीच्या नावावर केलेल्या विषारी प्रचाराला सध्याची तरुणाई भुलली होती. त्यांनी याच प्रचाराला बळी पडून भाजपला मतदान केले होते. आता या तरुणाईलाही सत्य पटवून देऊन पुन्हा कॉँग्रेसकडे घेतले पाहिजे. अनेकांचा रस्ता चुकला आहे. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम कॉँग्रेसने करावे. पतंगराव कदम म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांची हवा होती. त्यांच्याच निर्णयामुळे आता त्यांची गोची झालेली आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसने बाजी मारल्यामुळे राज्यातच नव्हे, तर आता देशातच कॉँग्रेसची हवा सुरू झालेली आहे. राज्यात सर्वत्र भाजपच्या घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. बोगस डिग्रीवाले शिक्षणमंत्री, व्यापमं घोटाळा अशा अनेक गोष्टींमुळे ही सरकारे कशापद्धतीने काम करताहेत, हे दिसत आहे. आता सुरुवात झाली आहे, अजून अनंत गोष्टी बाहेर येणार आहेत. हे सरकार दिशाहीन झाल्याने नागरिकांच्या पदरी काहीही पडलेले नाही. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, किशोर जामदार, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, मालन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजपचे खोटे आंदोलन!यावेळी प्रतीक पाटील म्हणाले की, जतच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, भाजपच्या नेत्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. खोट्या आंदोलनाने कोणतेही प्रश्न कधी सुटत नाहीत. त्यामुळे अशा नेत्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार जतच्या लोकांनीच आता केला पाहिजे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांना किती पैसे हे नेते आणतात, हे दिसेलच.कार्यकर्त्यांना चिमटा काढताना पतंगराव म्हणाले की, आता गावा-गावातील आपसांतील भांडणे सोडून द्या. तुमच्या गावाचे बजेट बुंडुकल्याएवढेही नसते. त्यामुळे तेवढ्या चिरीमिरीसाठी भांडण्यापेक्षा केंद्र व राज्याकडून निधी आणून गावाचा विकास करण्यावर भर द्या. या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला.