रेठरे धरण : राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक व रेठरे धरणचे माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या अपघाती मृत्यूने रेठरे धरण व परिसरावर शोककळा पसरली आहे. पाटील कुटुंबावर दुःखाचा आघात झाला असताना सांगली व सातारा जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
आनंदराव पाटील यांच्या अपघाती मृत्यूने रेठरे धरणच्या ग्रामस्थांना माेठा धक्का बसला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, विराज नाईक, चिखलीचे सरपंच राजेंद्र नाईक तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सदाशिवराव पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, आर. डी. सावंत, वारणा बँकेचे संचालक अभिजित पाटील, अरविंद बुद्रुक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, तंबाखू संघाचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक देवराज पाटील, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यासह मान्यवरांनी आनंदराव पाटील यांचे भाऊ उद्योजक दादासाहेब पाटील, मुलगा हर्षवर्धन, पुतण्या प्रतीक पाटील, तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले.