शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

सांगलीत काँग्रेसमध्ये ‘एकी’चे नारे, तर भाजपमध्ये ‘बेकी’चेच वारे; लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 4:20 PM

राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांध

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील रंग बदलत आहेत. काँग्रेसमधील युवा नेत्यांनी एकीचा निर्धार करीत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. दुसरीकडे विरोधी भाजपमध्ये गटबाजीचा अध्याय छुप्या पद्धतीने लिहिला जात आहे. काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी व ठाकरे गटातील पक्षांतर्गत वातावरणही फारसे चांगले नाही.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सांगलीत मोठा मेळावा घेऊन काँग्रेसने रणशिंग फुंकल्याने पक्षांतर्गत वातावरण बदलले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, मदन पाटील यांच्या पश्चात कार्यकर्ते खचले होते. या प्रमुख नेत्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. माजी मंत्री विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील अशी काँग्रेस नेत्यांची युवा फळी आता निवडणुकांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सरसावली आहे. या सर्वांनी एकीची मूठ आवळल्याने पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या यशामुळेही सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे.जिल्हा व तालुकास्तरावर पक्षीय निवडणूक प्रमुख नियुक्त करुन काँग्रेसच्या अगोदरच भाजपने लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला, मात्र पक्षांत गटबजीचे वारे वाहू लागले आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी अनेक नेत्यांचे राजकीय वैर जिल्ह्याला माहीत आहे. याशिवाय भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेसने उघडपणे एकसंधतेचा नारा दिला. पक्षांतर्गत वातावरणही त्याप्रमाणे बदलवले जात आहे. तसा नारा भाजप नेत्यांना देता आला नाही किंवा पक्षातील वातावरण बदलता आलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची वाट सध्या बिकट असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादीसमोरही अडचणींचे बांधराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व पक्षात एकसंधपणा टिकविण्यासाठी कारणीभूत ठरत असले तरी महापालिका क्षेत्रात या गोष्टीचा प्रभाव दिसत नाही. महापालिका क्षेत्रातील नेत्यांमध्ये मोठी गटबाजी दिसून येते. त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना बसू शकतो.ठाकरे गटासमोर अस्तित्वाची लढाईशिवसेनेच्या ठाकरे गटाला जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची त्यांना साथ मिळणार असली तरी पक्षसंघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक