शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

Sangli: मिरजेत काँग्रेसला धक्का, सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 4:23 PM

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरजेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने केला दावा

मिरज : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरजेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केल्याने मिरजेतील काँग्रेस नेते व मागासवर्गीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी काँग्रेसला रामराम करून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले.विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मिरज राखीव जागेवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात महाआघाडीतर्फे तूल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्याचे ठाकरे गटाचे धोरण आहे. मिरजेच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केल्याने ही जागा शिवसेनेला मिळणार असल्याच्या शक्यतेने विधानसभा उमेदवारीसाठी महाआघाडीतील अन्य काही इच्छुक मंडळीही शिवसेना प्रवेशाच्या तयारीत आहेत.शिवसेनेचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते इच्छुक असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेत भाजपविरोधात आणखी मजबूत उमेदवाराच्या शोधात आहेत. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची इच्छुक मंडळी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने मिरजेतील काँग्रेस नेते सिद्धार्थ जाधव यांनीही शिवसेना प्रवेश केला आहे. मिरजेतून २०१४मध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून सिद्धार्थ जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. सोमवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धार्थ जाधव यांना शिवबंधन बांधले. यावेळी खा. विनायक राऊत, खा. संजय राऊत, जिल्हाध्यक्ष संजय विभुते, अभिजित पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना