वाळवा : पलूस तालुक्यातील नागठाणेच्या सरपंचपदी काँग्रेसच्या बंडखोर माधुरी चंद्रकांत जोशी यांची बिनविरोध, तर उपसरपंचपदी भाजपचे भरत भिकाजी पाटील यांची बहुमताने निवड झाली. काँग्रेसचे दहा, तर भाजपचे पाच सदस्य असताना चमत्कार घडला आणि ‘कमळ’ फुलले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पलूस पंचायत समिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुहास कांबळे यांनी काम पाहिले. सरपंचपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित होते. सरपंच पदासाठी काँग्रेसच्या जयश्री बाजीराव मांगलेकर व काँग्रेसमधील फुटीर गट, भाजप-राष्ट्रवादी यांच्या संयुक्त गटाच्यावतीने माधुरी जोशी यांनी अर्ज दाखल केला होते. शेवटच्या क्षणी जयश्री मांगलेकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे माधुरी जोशी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.उपसरपंच पदासाठी भाजप-राष्ट्रवादीतून निवडून आलेले भरत पाटील व काँग्रेसचे झाकीरहुसेन लांडगे, भाजप-राष्ट्रवादीचे भीमराव शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली होती. शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे पाटील व लांडगे यांची उमेदवारी राहिले. त्यामुळे मतदान घेण्यात आले. पाटील यांना ९, तर लांडगे यांना ६ मते पडली. भरत पाटील ९ विरुध्द ६ अशा बहुमताने निवडून आले. ग्रामपंचायतीत काँग्रेसचे नऊ व बंडखोर काँग्रेसचे धनाजी पाटील (मेजर) असे १० जण निवडून आले होते. भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत चार जण, तर कांचन शिंदे अपक्ष निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या एकूण १५ जागा आहेत. (वार्ताहर)सदस्य सहलीवरून : ग्रामपंचायतीत दाखलसरपंचपदाच्या निवडणुकीवेळी पलूस पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकर तथा जयवंत पाटील यांच्या गटाचे उत्तम बनसोडे, त्रिवेणी मोकाशी, माधुरी जोशी, अलका कारंडे, सचिन शेळके हे काँग्रेसचे पाच सदस्य सवतासुभा मांडून सहलीवर गेले होते. त्यांनी भाजप-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. सरपंचपद फुटीर गटाच्या माधुरी जोशी यांना, तर उपसरपंचपद भाजप-राष्ट्रवादीच्या भरत पाटील यांना देण्याचे ठरले. सहलीवरून सोमवारी निवडीच्या वेळेतच येऊन ते दाखल झाले. नागठाणेच्या इतिहासात काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असताना, भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे नेते व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी काँग्रेसचे आ. पतंगराव कदम, महेंद्रआप्पा लाड यांना झटका देऊन ‘कमळ’ फुलविले आहे. खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी रूपाली बाबरभिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) गावच्या सरपंचपदी कॉँग्रेस पक्षाच्या सौ. रूपाली बाबर, तर उपसरपंचपदी विशाल शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. पतंगराव कदम यांचे समर्थक माणिक माने यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने नऊपैकी सहा जागा जिंकल्या होत्या. यावेळी संदीप माळी, सूर्यकांत शिंदे, अनिल चेंडगे, अरविंद मगदूम, महादेव पवार आदी उपस्थित होते.\धनगावच्या सरपंचपदी सुवर्णा पाटीलभिलवडी : धनगाव (ता. पलूस) गावच्या सरपंचपदी भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस युतीच्या सुवर्णा संभाजी पाटील यांची, तर उपसरपंचपदी उत्कर्ष ऊर्फ घन:श्याम भगवान साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या युतीने नऊपैकी सहा जागा जिंकून यश प्राप्त केले होते. यु. एम. भांगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. पलूस पंचायत समितीचे सदस्य आर. एम. पाटील यांच्याहस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आमणापूरचे सरपंच आकाराम पाटील, शंकरराव साळुंखे, दीपक भोसले, भीमराव साळुंखे, जिजाबाई साळुंंखे, अपर्णा हिरूगडे, वंदना जाधव, सत्पाल साळुंखे, नंदाताई पाटील, किसन बोडरे, कृष्णदेव तावदर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नागठाणेतील कॉँग्रेसमध्ये फूट
By admin | Published: November 16, 2015 11:24 PM