शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

..अन् थेट काँग्रेसचे प्रवक्ते बना, ‘यंग इंडिया के बोल’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 7:22 PM

पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळणार

सांगली : स्पर्धेत उतरा, चांगले भाषण करा आणि थेट काँग्रेसचे प्रवक्ते बना, असे आवाहन करीत काँग्रेसने ‘यंग इंडिया के बोल’ ही वर्क्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर युवा प्रवक्ते निवडले जाणार आहेत. १५ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत आहे.युवक काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व स्पर्धेचे राज्याचे प्रभारी हनुमंत पवार यांनी या स्पर्धेची माहिती आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्यावतीने ‘यंग इंडिया के बोल’ ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा यंदाही होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत स्पर्धा होईल.देशाचा इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ, काँग्रेस पक्षाचे योगदान आणि केंद्र सरकारचे अपयश यावर तरुणांनी जाहीरपणे बोलले पाहिजे हा स्पर्धेमागचा उद्देश आहे. काँग्रेसचा इतिहास आणि केंद्र सरकारचे अपयश मांडण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा होणार आहे.

राहुल गांधी यांच्यासमोर बोलण्याची संधीपवार म्हणाले, जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना पाच, तीन व दोन हजाराचे रोख बक्षिस आहे. एक हजारची तीन बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जातील. तसेच प्रमाणपत्रही दिले जाईल. राज्यस्तरावरील विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळेल. स्पर्धेतून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रवक्ते निवडले जाणार आहेत. स्पर्धा ३५ वर्षाच्या आतील तरूणांसाठी असणार आहे. सात मिनिटाचा बोलण्याचा कालावधी असून वक्तृत्व शैली, अभ्यास याचा विचार करुन परिक्षक विजेते निवडतील. नोंदणीसाठी पक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज सरगर, उपाध्यक्ष गीतांजली पाटील, हर्षद कांबळे, गणेश देसाई, श्रवण मगदूम, विनायक कोळेकर, सलमान मिस्त्री, प्रतीक बजबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस