मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने

By शीतल पाटील | Published: July 25, 2023 06:11 PM2023-07-25T18:11:44+5:302023-07-25T18:12:24+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

Congress protests in Sangli against Manipur women oppression | मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने

मणिपूर महिला अत्याचाराविरोधात सांगलीत काँग्रेसची निदर्शने

googlenewsNext

सांगली : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेने सारा देश हादरला. यातील नराधमांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करीत जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली.

प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. पाटील म्हणाल्या की, सध्या महिला स्वातंत्र्यावर गदा येत आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण स्त्रिया समाज धोक्यात आल्या आहेत. देशामध्ये महिलांच्यावरील अत्याचार वाढत आहेत. मणिपूरमधील प्रकार संतापजनक आहे. यातील सर्व आरोपांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. अन्यथा स्त्रीशक्ती अशा प्रवृत्तीचा नाश केल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी माजी सरपंच शोभा चव्हाण, अंगणवाडी सेविका संघटना प्रतिनिधी शुभांगी कांबळे, नगरसेविका शुभांगी साळुंखे, मदिना बारूदवाले, माजी सरपंच शैलजा पाटील पद्माळे, माजी सभापती मनोरमा कुंभार, मिरज तालुका उपाध्यक्ष निर्मला बस्तवडे, माजी जि. प. सदस्य सुचिता कांबळे उपस्थित होत्या.

Web Title: Congress protests in Sangli against Manipur women oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.