शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पलूसमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का

By admin | Published: February 23, 2017 11:02 PM

भाजप-राष्ट्रवादीला यश : कॉँग्रेसला गटबाजीचा फटका

किरण सावंत--पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजप-राष्ट्रवादी युतीने मोठे यश मिळविले आहे. या पराभवामुळे कॉँग्रेसवर मात्र आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.पलूस तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचही जागांवर कॉँग्रेसने विजय मिळविला होता, तर पंचायत समितीवरही सत्ता काबीज केली होती. मात्र या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या चारही जागा कॉँग्रेसने गमावल्या आहेत. तालुक्यात भाजप व राष्ट्रवादीने योग्यवेळी युती करुन कॉँग्रेसला शह दिल्याने, भाजपने तीन, तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली.माजी आ. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शह देण्यासाठी योग्य रणनीती आखली व त्यामध्ये ते यशस्वी ठरले.पलूस तालुका कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र जिल्हा परिषद व समितीतील अनपेक्षित अपयशामुळे आमदार डॉ. पतंगराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक गावात कॉँग्रेसमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीमुळेच पराभव झाल्याचे मानले जात आहे. कॉँग्रेसचा पराभव कॉँग्रेसच करु शकते, हे पुन्हा सिध्द झाले असून, या जबरदस्त पराभवानंतर आता आमदार डॉ. कदम गावोगावी असणाऱ्या गटबाजीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पराभवाने कॉँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. डॉ. कदम यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते व कार्यकर्ते कमी पडल्याचेच या पराभवाने सिध्द झाले आहे. मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुंडल जिल्हा परिषद गटातही आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड विजयी झाले आहेत. दुधोंडी, भिलवडी व अंकलखोप जि. प. गटातही भाजपने मुसंडी मारली. केवळ पंचायत समितीच्या आमणापूर व वसगडे गणातच कॉँग्रेसला यश आले. सत्तेला सुरुंग पंचायत समितीमध्ये आठपैकी चार जागा भाजपने, तर दोन जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. कॉँगे्रसला दोन जागा मिळाल्या. कॉँग्रेसच्या पंचायत समितीतील दहा वर्षाच्या सत्तेला भाजप-राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे.