सांगली : काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाख ४१ हजार ७३५ रुपयांची आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीच्या तुलनेत ८ कोटी ८० लाख ८४ हजार ७९९ रुपयांनी त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.विशाल पाटील यांच्या नावावर २६ कोटी ७४ लाख ९३ हजार ३९ तर त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या नावे ३ कोटी ७७ लाख ४८ हजार ६९६ रुपयांची संपत्ती आहे. त्यात जंगम व स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. विशाल पाटील यांच्याकडे १० कोटी ५९ लाख १३ हजार ८३४ रुपयांची जंगम तर १६ कोटी १५ लाख ७९ हजार २०५ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी पूजा यांच्या नावे ३ कोटी ३ लाख ७३ हजार ३०७ रुपयांची जंगम तर ७३ लाख ७५ हजार ३८९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती विशाल पाटील यांची होती. २०२४ च्या निवडणुकीत आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत संजय पाटील यांची संपत्ती सर्वाधिक आहे.कर्जाचा भारही कमीविशाल पाटील यांच्या नावे २०१९ मध्ये १० कोटी ३० लाख ६२ हजार ५९४ रुपयांचे कर्ज होते. सध्या ७ कोटी ६५ लाख २ हजार ५६० रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ६१ लाख ७६ हजार ९८९ रुपयांचे कर्ज आहे. पाच वर्षात २ कोटी ६५ लाखाने त्यांच्या कर्जाचा भार कमी झाला आहे.
काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या संपत्तीत ८.८० कोटींने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 1:27 PM