सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया संपली असून, आघाडीअंतर्गत सर्वाधिक २0 अर्ज काँग्रेसकडे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यात सर्वाधिक अर्ज मिरज व जतसाठी आले आहेत.सांगली जिल्ह्यातील एकूण आठ मतदारसंघांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागविण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मुदतीत आलेल्या अर्जांची छाननी करून प्रदेश कार्यकारिणीकडे अहवाल पाठविण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.सोमवारी काँग्रेसने त्यांच्याकडील इच्छुकांची यादी जाहीर केली. दाखल झालेल्या एकूण २0 अर्जांपैकी १0 अर्ज हे एकट्या मिरज मतदारसंघातून दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून सर्वाधिक अर्ज हे मिरजेतून दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अर्ज मिरज व जत मतदारसंघातून आले आहेत.सांगली विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सुभाष खोत, संतोष बाबूराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहेत. मिरज मतदारसंघासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा डावरे, काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे सदाशिव वाघमारे, डॉ. नामदेव कस्तुरे, सिद्धार्थ जाधव, नंदादेवी कोलप, अरुण धोत्रे, धनराज सातपुते, हेमराज सातपुते, सदाशिव खाडे, विनय कांबळे यांनी, पलूस-कडेगाव मतदार संघातून आ. विश्वजित कदम यांनी, शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख, खानापूर-आटपाडीमधून राजाराम देशमुख, तासगाव - कवठेमहांकाळमधून अविराजे शिंदे, जतमधून विक्रम सावंत, चंद्रकांत सांगलीकर यांचे अर्ज दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे आलेल्या अर्जांमध्ये जत विधानसभा मतदारसंघासाठी नगरसेवक विष्णू माने, माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पा होर्तीकर, सुरेश शिंदे, रमेश पाटील यांनी, मिरजेतून जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे, प्रमोद इनामदार, उत्तम कांबळे यांनी, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आ. सुमनताई पाटील आणि शिराळा मतदारसंघातून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातून शरद लाड यांनी, तर खानापूर-आटपाडी मतदारसंघातून बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख आणि रावसाहेब पाटील इच्छुक आहेत.
काँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक, सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 2:28 PM
सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया संपली असून, आघाडीअंतर्गत सर्वाधिक २0 अर्ज काँग्रेसकडे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यात सर्वाधिक अर्ज मिरज व जतसाठी आले आहेत.
ठळक मुद्देकाँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी