शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

कडेपुरात भाजपच्या वर्चस्वाला कॉँग्रेसचे आव्हान

By admin | Published: December 31, 2016 11:15 PM

जिल्हा परिषद निवडणूक : संग्रामसिंहांसाठी लाल दिव्याच्या आशा पल्लवित, राष्ट्रवादीही ताकद अजमावणार

प्रताप महाडिक --कडेगाव  कडेगाव तालुक्यातील कडेपूर जिल्हा परिषद गट भाजपचा बालेकिल्ला असून, येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र कॉँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसने येथे झुंज देण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी कॉँग्रेसच्या इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसही येथे ताकद अजमावणार असल्याचे समजते. कडेपूर जिल्हा परिषद गट खुला झाल्याने अध्यक्षपद खुले असल्याने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे उपाध्यक्ष आणि माजी आ. संपतराव देशमुख यांचे पुत्र संग्रामसिंह देशमुख यांना लाल दिव्याची संधी चालून आली आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत झाले, तर निश्चितपणे लाल दिव्याच्या शर्यतीत उतरतील, अशी आशा आहे. यामुळे येथे भाजपकडून संग्रामसिंह यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. या गटात कॉँग्रेसकडूनही भाजपला टक्कर देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. कडेपूर येथील ज्येष्ठ नेते, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बबनराव ऊर्फ भाऊसाहेब यादव देशमुख यांचे पुतणे सत्यजित ऊर्फ बंडूभैया यादव-देशमुख किंवा अमरापूर येथील सुनील पाटील यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच भाजप नेतृत्वाने संधी दिल्यास कडेपूर येथील नेताजीराव यादव हे भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे व्यक्त केली आहे. या गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. येथे पक्षादेश आला तर युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शकील मुल्ला निवडणूक लढविण्यास तयार आहेत. कडेपूर पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. येथे भाजपचे वर्चस्व असल्याने येथे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. या गणातून हणमंतवडिये येथील माधवी संग्राम मोरे, सोहोली येथील भाजप नेते आणि कडेगाव तालुका भाजप अध्यक्ष हिम्मत देशमुख यांच्या पत्नी मनीषा देश्मुख, कडेपूर येथील माजी पंचायत समिती सदस्या मनीषा हिंदुराव यादव, हणमंत वडीये येथील अलका मोहन मोरे, चिखली येथील रंजना रवींद्र शिंदे तसेच अर्चना जयवंत शिंदे आदी महिला उमेदवार भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. कडेपूर पंचायत समिती गणात अमरापूरचे सरपंच सुभाष मोरे यांच्या पत्नी संगीता मोरे या काँगे्रसकडून इच्छुक आहेत. दरम्यान, उमेदवारी मिळो अगर न मिळो, भाजप पक्षाचे काम ताकदीने करणार असल्याचे सर्व भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी सांगितले. हिंगणगाव बु्रदुक पंचायत समिती गण खुला आहे. या गणातही भाजपचे वर्चस्व असले तरी, येथे अटीतटीच्या लढतीची परंपरा आहे. या गणात भाजपकडून उपाळे मायणी येथील उपसरपंच प्रा. आशिष ऊर्फ योगेश जयसिंग घार्गे, शंकर सुभेदार घार्गे यांच्यासह तोंडोली येथील शंकरराव मोहिते, भिकवडीचे ज्येष्ठ नेते युवराज सावंत, उफाळे मायणी येथील संग्राम घारगे आदी इच्छुक आहेत. हिंगणगाव बुद्रुक गणातून कॉँग्रेसकडून दिग्गज उमेदवार देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या गणातून तोंडोलीचे सरपंच विजय मोहिते, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम यांनी कॉँग्रेस उमेदवारीसाठी डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. कडेपूर जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि हिंगणगाव ब्रुद्रुक पंचायत समिती गणातील लढती कशा होणार आणि कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.