शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आघाडीची जुळवाजुळव

By admin | Published: January 20, 2017 11:28 PM

रेठरेहरणाक्ष गट राखीव : इच्छुकांचे मनसुबे धुळीस, सर्वपक्षीय आघाडीची घोषणा; मात्र शिवसेनेचा स्वबळाचा नारा

प्रशांत चव्हाण, निवास पवार ल्ल ताकारी / शिरटेवाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्याचे मनसुबे विरोधी गटाचे आहेत. मंत्री सदाभाऊ खोत यांनी सर्वपक्षीय आघाडीची घोषणा केली असली, तरी शिवसेनेने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. एकास एक लढत झाल्यास ही निवडणूक लक्षवेधी व चुरशीची होणार आहे.रेठरेहरणाक्ष गटात रेठरेहरणाक्ष व किल्लेमच्छिंद्रगड पंचायत समिती गणाचा समावेश आहे. रेठरेहरणाक्ष गण इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी, तर किल्लेमच्छिंद्रगड गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. रेठरेहरणाक्षचे बाळासाहेब मोरे यांनी १५ वर्षे जिल्हा परिषदेत काँगे्रसचा झेंडा फडकवत ठेवला होता. पुढे येडेमच्छिंद्रचे प्रकाश पाटील यांच्या जि. प. निवडणुकीतील खळबळजनक विजयाने काँग्रेसला उभारी आली होती.अलीकडे राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक निष्ठावंत नाराज आहेत. राष्ट्रवादीतील काही इच्छुकांनी स्वत:च उमेदवारी जाहीर करुन पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, अन्यथा विरोधी गटाची कास धरू, असा पवित्रा काहींनी घेतला आहे. विद्यमान जि. प. सदस्या सुनीता वाकळे यांच्या संपर्काअभावी मतदार संघात नाराजी आहे. याचा फटकाही राष्ट्रवादीला बसू शकतो. त्यामुळे उमेदवार निवडताना राष्ट्रवादीला झाऱ्यातून पाणी शोधून घ्यावे लागणार आहे.हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाढलेली ताकद, इस्लामपूर नगरपालिकेतील विकास आघाडीला मिळालेले यश, केंद्रात व राज्यात असणारे भाजपचे सरकार व सदाभाऊ खोत यांना मिळालेले मंत्रीपद ही विरोधकांची जमेची बाजू आहे. आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी खोत यांनी राष्ट्रवादीतील काही मोहरे वळविण्यासाठी चाली खेळल्या आहेत. त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, हे स्पष्ट होईलच.रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीकडे रेठरेहरणाक्षचे विद्यमान उपसरपंच धनाजी बिरमुळे, तानाजी कोळेकर, विवेक अवसरे, राहुल कोळेकर, अजित कोळेकर, नंदकुमार कोळेकर, संदीप माळी, ज्ञानदेव माळी, शिरटे येथून डी. वाय. तांदळे, तर येडेमच्छिंद्र येथून शिवाजी सुतार यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. विरोधी गटाकडून रेठरेहरणाक्षचे शरद अवसरे, दिलीप कोळेकर, हरिभाऊ कुंभार, किल्लेमच्छिंद्रगडचे सुनील पुजारी यांची नावे चर्चेत आहेत.रेठरेहरणाक्ष पं. स. गणातून राष्ट्रवादीकडून भवानीनगरचे शामराव मोरे, येडेमच्छिंद्र येथील माजी उपसरपंच प्रकाश लोहार, अभियंता सचिन हुलवान प्रबळ दावेदार आहेत, तर विरोधी विकास आघाडीतून गणेश हराळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बिचूदचे संदीप पाटील हेही इच्छुकांच्या यादीत आहेत. येडेमच्छिंद्र येथील अर्जुन देशमुख यांनी १५ दिवसांपूर्वीच शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे जाहीर करुन प्रचाराची सुरुवात केली आहे.किल्लेमच्छिंद्रगड पं. स.साठी नरसिंहपूर येथून वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव, शिरटे येथून तालुका सदस्या सौ. जयश्री निवास पवार, कृष्णाचे माजी संचालक हणमंतराव पाटील यांच्या स्रुषा सौ. सुरेखा गुलाबराव पाटील, कोळे येथून सौ. अलकादेवी आबासाहेब पाटील, सौ. अरुणा जीवन जाधव, किल्लेमच्छिंद्रगडमधून पं. स. सदस्य सुनील पोळ यांच्या पत्नी सौ. विजया पोळ, सौ. सारिका राहुल निकम, सौ. मंजुश्री तानाजी यादव, सौ. सविता हणमंत मोरे, सौ. सुरेखा तुकाराम मठकरी यांची मागणी आहे, तर विकास आघाडीकडून सौ. वैशाली शशिकांत साळुंखे यांनी उमेदवारी निश्चित मानून प्रचारास सुरुवात केली आहे. रेठरेहरणाक्ष जिल्हा परिषद मतदार संघात एकूण १० गावे आहेत. रेठरेहरणाक्ष पंचायत समिती गणात रेठरेहरणाक्ष, भवानीनगर, बिचूद व येडेमच्छिंद्र या गावांचा समावेश आहे. किल्लेमच्छिंद्रगड पंचायत समिती गणात किल्लेमच्छिंद्रगड, लवणमाची, बेरडमाची, कोळे, नरसिंहपूर व शिरटे या गावांचा समावेश आहे.