वैभव शिंदे यांनी कोल्हापूर येथे उद्योजक रामप्रताप झंवर यांना अभिवादन केले. यावेळी नीरज झंवर, रोहन झंवर, नितीन झंवर, वरदराज शिंदे व सहकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योजक, फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य उद्योजक रामप्रताप झंवर यांचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. झंवर कुटुंबीयांची आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
माजी आमदार विलासराव शिंदे व उद्योजक रामप्रताप झंवर अत्यंत जवळचे स्नेही होते. आष्टा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टिकोनातून दोघा दिग्गजांनी अहोरात्र मेहनत घेतली. झंवर कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदे व झंवर यांच्या जुन्या आठवणी आणि कार्यकर्तुत्वाला उजाळा दिला. यावेळी झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे नीरज झंवर, रोहन झंवर, नितीन झंवर, वैभव शिंदे, वरदराज शिंदे, सागर जगताप, दत्तराज हिप्परकर, अमोल खंचनाळे व झंवर कुटुंबीय उपस्थित होते.