सांगली : मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, शिराळा, पलूस तालुक्यातील ऊसतोडी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडल्या.
गांधीगिरीनेही कारखानदार तोडी बंद ठेवत नसल्यामुळे, आक्रमक झालेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मजुरांना उसाच्या फडातून हाकलून लावले. दरम्यान, संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष असून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
ऊस दराचा तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम चालू करु नयेत, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. मात्र याविरोधातील भूमिका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेने घेतली आहे. संघटनांतील फुटीचा फायदा साखर कारखानदारांनी उठवत गळीत हंगाम सुरु केले आहेत. गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटना, शेतकरी सेना यांनी जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या होत्या. गुरुवारी बहुतांशी संघटनांनी मजुरांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी मार्गाने ऊसतोडी बंद ठेवण्यासाठी विनंती केली होती.
संघटनांच्या या विनंतीला काही कारखान्यांनी प्रतिसाद देत गाळप बंद ठेवले असले तरी, बहुतांशी कारखान्यांनी शुक्रवारी गळीत हंगाम चालूच ठेवला होता. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोडी बंद पाडल्या.
रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव येथील अथणी शुगर, दत्त इंडिया कारखान्याच्या ऊसतोडी बंद पाडून मजुरांना उसाच्या फडातून हाकलून लावले. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव, हरोली येथीलही दत्त इंडिया कारखान्याच्या ऊसतोडी बंद पाडल्या. मिरज पूर्व भागातही कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांनी ऊसतोडी सुरु केल्या होत्या. पण, तेथील तोडीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या.
शेतकºयांची ऊस तोडण्यास सहमती असेल तर संघटनांनी ऊसतोडी बंद पाडू नयेत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांनी ऊसतोडी रोखणाºया संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संघटनांच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.तोडगा निघेपर्यंत तोडी घेऊ नयेत : मानेशेतकºयांच्या हितासाठी आम्ही आंदोलने करत आहे. पोलीस संघटनांचे आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत शेतकºयांनीच कारखान्यांना ऊस घालू नये, असे आवाहन रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक माने यांनी केले आहे.