सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धार मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. आसद, ता. कडेगांव येथे दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन आदोंलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने, लाखो लीटर दुधाचे संकलन झाले नाही. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलनाची धार कायम राहिली.
मंगळवारीही जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकर्यांनी आंदोलनाला प्रतिसाद दिला. आसद येथे दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन आदोंलन करण्यात आले. शेतकर्यांनी दुध रस्त्यावर ओतुन सरकारचा निषेध केला.
आसद ता. कडेगांव येथे दररोज होणारे पाच हजार लिटर संकलन ठप्प झाले आहे, तरीही शासन दुध दरासाठी कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही, याचा निषेध म्हणुन दुध उत्पादक शेतकर्यांनी एकञ येऊन दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन व दुध रस्त्यावर ओतुन शासनाचा निषेध केला.
जत उत्तर भागात सकाळचे दुध संकलन झाले नाही. खाजगी दुध संघानीही सकाळचे दुध संकलन केले नाही. शेगाव, वाळेखिंडी, बनाळी, वायफळ, कोसारी, कुंभारी या भागात सकाळी दुध संकलन झाले नाही. शेतकऱ्यांनी शिल्लक दुधाचा घरी खवा केला तर काहींनी हाँटेल चालकांना विकले. जर्सी गाईचे दूध मात्र ओतून नष्ट करण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांपूढे नसल्याचे दिसून आले.
नागठाणे, पडवळवाडी, शिरगाव येथील दुध संकलन ठप्प झाले. अमरापूर येथे आंदोलकांनी १ हजार लिटर दुध रस्त्यावर ओतले. कडेगांव तालुक्यातील ६५००० लिटर दुध संकलन ठप्प झाले. मंगळवारीही जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकर्यांनी आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला.