सांगली: जिल्ह्यात तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असून कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सांगलीतील नदीपातळी १८ फुटांवर गेली होती. अलमट्टी धरणातील विसर्गही आता दीड लाखाने सुरू करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. अधून-मधून विश्रांती घेत रविवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाची हजेरी होती. दुसरीकडे कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस कायम आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी पंधरा फुटांवर असलेली पाणीपातळी रविवारी १८ फुटांवर गेली आहे. पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून दीड हजारावर क्युसेकने विसर्ग सुरू असून काही ठिकाणी वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे.जिल्ह्यातील पाऊस रविवारी सकाळी ८ पर्यंतमिरज ७.९जत २खानापूर ३.७इस्लामपूर २२.१तासगाव ५.६शिराळा ३४.४आटपाडी १.४क. महांकाळ २.५पलूस १२.२कडेगाव ५.७