शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

मानवतेचा मळा फुलविण्यात साहित्याचे योगदान : महावीर जोंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:07 AM

समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देकर्नाळमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

सांगली : समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे.

त्यामुळेच समाजात समतावादाचे संस्कार पेरण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असून, घातक रूढींना मूठमाती देत मानवतेचा मळा फुलविण्यात साहित्याचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी गुरूवारी कर्नाळ (ता. मिरज) येथे केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट साहित्य सभा कोल्हापूर यांच्यावतीने कर्नाळ येथे आयोजित पाचव्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी संमेलनाची अध्यक्षा तेजश्री पाटील, स्वागताध्यक्ष मयूर पाटील या विद्यार्थ्यांसह जिल्हाभरातील साहित्यप्रेमी शिक्षक उपस्थित होते.

जोंधळे म्हणाले, देशाची संस्कृती आणि परंपरा सर्वसमावेशक असताना, आजची घातक परंपरा त्यास मोडीत काढत आहे. विचार मारून टाकत, नव्या विचारांचे आक्रमण केले जात आहे. अशा काळात मानवतावादी व समतावादी दृष्टिकोनाची समाजाला गरज आहे. वाचनातूनच हा दृष्टिकोन निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचनास प्राधान्य द्यावे. समाजात बदल घडविण्याची ताकद साहित्य, नाट्य चळवळीत असते. लेखकाचे आडनाव वाचून कविता, कथा वाचू नका, तर जे जे सकस मिळेल, ते साहित्य वाचण्यास विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे.

सांगली जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा असून साहित्यिकांच्या गावांची तीर्थस्थळेच झाली पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांनी साहित्यिकांच्या गावांना भेट देऊन इतिहास जाणून घेतला पाहिजे. विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नव्या पिढीचे दर्शन घडत असून साहित्य चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी याची आवश्यकता आहे.

यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, संमेलनाचे निमंत्रक मुश्ताक पटेल, शिक्षण अधिकारी नामदेव माळी, रघुनाथराव पाटील, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, बजरंग संकपाळ, नीलम माणगावे, मच्छिंद्र ऐनापुरे यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, साहित्यप्रेमी उपस्थित होते.मोबाईल नको पुस्तक द्याजोंधळे म्हणाले, आजचे पालक विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देतात. या मुलांना मोबाईलची काहीही गरज नसून त्यांना पुस्तकांची जास्त गरज आहे. घरामध्ये पुस्तक वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होणार आहे. पुस्तकाशिवाय माणूस घडत नाही, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यास शिक्षकांनी प्राधान्य द्यावे. 

सातव्या वेतन आयोगाचा सदुपयोग कराजोंधळे म्हणाले, शिक्षकांना आता सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. याचा उपयोग आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी करा. त्यांना घरात एक स्वतंत्र वाचनालय तयार करून पुस्तके आणून द्या, संगणक उपलब्ध करून द्या. आव्हाने स्वीकारण्यासाठी आवश्यक विविध विषयांवरील पुस्तक वाचनात आपल्या पाल्यांना त्यांना रमू द्या. अशाप्रकारे वाढलेल्या पगाराचा सदुपयोग करा.

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक