शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

तासगावची वादग्रस्त महिला कर्मचारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:02 PM

तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

ठळक मुद्देतासगावची वादग्रस्त महिला कर्मचारी सक्तीच्या रजेवरमानधनातून प्रत्येकी दहा हजार रुपये लाचेची मागणी

सांगली : तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

तिच्या सर्व गैरकारभाराच्या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (बेलापूर) यांच्याकडे पाठविला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांने, समूह संसाधन व्यक्ती म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडे, त्यांना मिळालेल्या मानधनातून प्रत्येकी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची चर्चा होती.

काही बचत गटांच्या नावावर कर्ज काढून उसने पैसे घेतले होते. तसेच हिरकणी पुरस्कार देण्यासाठीदेखील या महिलेने वीस हजार रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे. हा विषय लोकमतने चव्हाट्यावर आणला होता.या प्रश्नावर सोमवारी तासगाव पंचायत समितीमध्येही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पंचायत समितीच्या सभापती कमल पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे अहवाल पाठवून, वादग्रस्त महिला कर्मचाऱ्यांची येथून बदली करा आणि त्याच्या कारभाराची सखोल चौकशी करा, अशी मागणी केली होती.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्यास तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तिच्याविरोधात जेवढ्या तक्रारी आल्या होत्या, त्यांचा सविस्तर अहवाल बेलापूर येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाकडे मंगळवारी पाठविला आहे. या अहवालामध्ये त्यांनी, संबंधित महिला कर्मचाऱ्याचा गैरकारभार लक्षात घेता, तिची सेवा खंडित करण्याची शिफारस केली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळ