शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Sangli: खासदारकीचे विमान टेकऑफ होण्याआधीच पेटला वाद, आगामी विधानसभेसाठी 'महायुती'मध्ये नेत्यांच्यात स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 3:55 PM

लोकसभेवर टार्गेट अन् विधानसभेवर डोळा..

अशोक पाटीलइस्लामपूर : एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांनी मतदारांसाठी आभार मेळावा घेतला. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे दिल्ली विमान टेकऑफ होण्याअगोदरच इस्लामपुरातील नेत्यांच्यात श्रेयवाद आणि निष्ठेवरून वादाला तोंड फुटले आहे. आगामी विधानसभेच्या उमेदवारीची स्पर्धा ही यामागील राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.गत विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरचे तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपकडून उमेदवारी मागितली होती. परंतु मतदारसंघ शिवसेनेला गेला. त्यामुळे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने यांनी हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी यांना ताकद देऊन शिवसेनेत घेतले. तेव्हाच निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करून इस्लामपूर मतदारसंघात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपमध्येच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून विधानसभेची तयारीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हातकणंगलेतून लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधूनही युद्धपातळीवर प्रयत्न झाले. परंतु मतदारसंघ शिवसेनेला गेला. तेव्हापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली. भाजपमधील नेत्यांत पूर्वीपासूनच अंतर्गत वाद आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सवतासुबा मांडून भाजपचाच प्रचार करत असल्याचा दावा केला.

लोकसभेवर टार्गेट अन् विधानसभेवर डोळा..महायुतीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, राहुल महाडिक, अमित ओसवाल, गजानन फल्ले, मनसेचे सनी खराडे यांनी भाजपवरील पक्षनिष्ठेवरून थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनाच टार्गेट केले. यामध्ये निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने आणि गौरव नायकवडी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांना लोकसभेची उमेदवारी मागितली. पण ती न मिळाल्याने त्यांनी विधानसभेवर डोळा ठेवून आरोपप्रत्यारोप केल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाजपची सत्ता येते, त्यावेळी नेत्यांची मोठ्या प्रमाणात आयात होते. हेच नेते सत्तेचा पूर्णपणे फायदा उठवतात आणि पक्षात दुफळी करतात. इस्लामपूर मतदारसंघात आमच्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे प्रयत्न होतात, याला आयात आणि सत्तेचे लाभ घेतलेले नेतेच कारणीभूत आहेत. हेच नेते गटबाजी करून विरोधकांना निवडणूक सोपी करून देतात. -विक्रम पाटील, ज्येष्ठ नेते (भाजप)

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा