शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

जिल्ह्यात १२७४ जणांना कोरोना; १६१२ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:29 AM

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, बुधवारीही हेच दिलासादायक चित्र कायम होते. दिवसभरात १२७४ जणांना कोरोनाचे ...

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, बुधवारीही हेच दिलासादायक चित्र कायम होते. दिवसभरात १२७४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १६१२ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, शिवाय उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ४, मिरज व कुपवाड प्रत्येकी १, तर वाळवा तालुक्यात ६, जत, मिरज तालुक्यांत प्रत्येकी ५, पलूस ३, आटपाडी, कडेगाव, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत प्रत्येकी २, खानापूर आणि शिराळा तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २०५५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५८३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजनच्या ३९९३ जणांच्या तपासणीतून ७२९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असून, सध्या १२ हजार ८७६ जण उपचार घेत आहेत. त्यातील २०६४ जणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यातील १७९१ जण ऑक्सिजनवर, तर २७३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला असून, नवे ३८ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

म्युकरमायकोसिसचे दोन बळी

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस बाधितांची संख्या कायम असून, बुधवारी दिवसभरात उपचार घेत असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १०८ रुग्ण असून, मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ११३२०८

उपचार घेत असलेले १२८७६

कोरोनामुक्त झालेले ९७०६६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३२६६

बुधवारी दिवसभरात

सांगली १२१

मिरज ३८

वाळवा १९७

मिरज तालुका १९४

कडेगाव १२१

तासगाव, शिराळा ११९

जत १११

खानापूर १०८

पलूस ६९

आटपाडी ५१

कवठेमहांकाळ २६