जिल्ह्यातील बाधितांची संख्या नियंत्रणात असताना, बळींची संख्याही नसल्याने कोरोनाचा उतार कायम आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज आणि वाळवा तालुक्यांत एकाही नव्या बाधिताची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३३१ नमुन्यांची चाचणी घेतली त्यात १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड अँटिजेनच्या ९९६ चाचण्यांमधून चारजणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १८६ रुग्णांपैकी ४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३४ जण ऑक्सिजनवर, तर नऊजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तिघांना कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७४५२
उपचार घेत असलेले १८६
कोरोनामुक्त झालेले ४५५३९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२७
गुरुवारी दिवसभरात
सांगली १
मिरज १
आटपाडी ४
खानापूर २
जत, कडेगाव, शिराळा, पलूस, तासगाव प्रत्येकी एक