जिल्ह्यात दररोज सरासरी २० बाधितांची नोंद होत आहे. शुक्रवारी त्यात घट होत कमी रुग्ण आढळले आहेत. मिरज शहरासह पलूस, जत, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा तालुक्यांत एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३१२ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली त्यात तिघांना काेरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड अँटीजेनच्या ८०१ चाचण्यांमधून ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात सध्या सहा ठिकाणी २०३ कोराेना रुग्णांवर उपचार केले जात असून, त्यात ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३२ जण ऑक्सिजनवर, तर आठजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७७४६
उपचार घेत असलेले २०३
कोरोनामुक्त झालेले ४५८०८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३५
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ४
वाळवा, तासगाव प्रत्येकी तीन
आटपाडी, कडेगाव, खानापूर प्रत्येकी एक