सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी १४ ने वाढ झाली. बाधितांची संख्या मर्यादित असताना, बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. त्यानुसार दिवसभरात ३७ जणांनी कोरोनावर मात केली, तर मिरज तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांची कमी होत असलेली संख्या व मृत्यूची संख्याही कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात मिरज शहरासह जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुका, पलूस व शिराळा तालुक्यात एकाही नव्या बाधिताची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत ९७ जणांच्या नमुन्यांची चाचणी केली. त्यात ५ जणांना काेरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १०३९ जणांच्या चाचणीमधून ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील विविध रूग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या २२३ रुग्णांपैकी ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३२ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७४०२
उपचार घेत असलेले २२३
कोरोनामुक्त झालेले ४५४५२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२७
सोमवारी दिवसभरात
सांगली २
आटपाडी ५
कडेगाव ३
खानापूर २
तासगाव, वाळवा प्रत्येकी एक