सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात १६०१ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर परजिल्ह्यातील १३ तर जिल्ह्यातील ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. १,५७३ जण कोरोनामुक्त झाले असले, तरी वाढती मृत्यूची संख्या चिंता वाढविणारी आहे. जत तालुक्यात सर्वाधिक २७३ रुग्ण सापडले आहेत.
शनिवारी जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. त्यात महापालिका क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात सांगली ६, मिरज २, कुपवाड एक तर वाळवा, खानापूर तालुक्यात प्रत्येकी ७, जत, तासगाव तालुक्यात प्रत्येकी ५, आटपाडी, कडेगाव तालुक्यात प्रत्येकी ४, शिराळा, मिरज तालुक्यात प्रत्येकी ३ तर कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य यंत्रणेच्या वतीने शनिवारी ६,४४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात आरटीपीसीआरअंतर्गत २,३३४ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात ७४२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजनच्या ४,१०९ नमुन्यांच्या तपासणीतून ९५१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील १६ हजार ९८५ जण उपचारासाठी दाखल असून, त्यातील २,५५३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २,२२१ जण ऑक्सिजनवर तर ४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला असून, नवे ९२ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ९९,३०६
उपचार घेत असलेले १६,९८५
कोरोनामुक्त झालेले ७९,४४२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २,८७९
शनिवारी दिवसभरात
सांगली ९२
मिरज ५२
जत २७३
मिरज तालुका १९०
खानापूर १६८
कडेगाव १३६
आटपाडी १२७
शिराळा १२६
तासगाव ११०
पलूस ९९
कवठेमहांकाळ ५२