शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

जिल्ह्यात २०४६ जणांना कोरोना; ५८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:28 AM

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ ...

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ जण कोरोनामुक्त झाले. मात्र रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आटपाडी, जत, खानापूर, मिरज, वाळवा तालुक्यांत दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी ४५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली ३, मिरज ६, तासगाव तालुक्यांत ७, जत ६, वाळवा ५, कडेगाव, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ४, शिराळा २, खानापूर, आटपाडी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २९८० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ११२९ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ३८३६ जणांच्या तपासणीतून १००८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ झाली असून त्यातील २५८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३३९ जण ऑक्सिजनवर तर २३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील ९१ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ८७६९३

उपचार घेत असलेले १६७३४

कोरोनामुक्त झालेले ६८४०३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २५५६

शुक्रवारी दिवसभरात

सांगली शहर १५६

मिरज शहर १४१

मिरज तालुका २८६

वाळवा २८०

जत २६५

खानापूर २२७

आटपाडी २१८

तासगाव १३६

कवठेमहांकाळ ९२

पलूस ९१

कडेगाव ८९

शिराळा ६५