सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना बुधवारी २१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे.
गेल्या चार दिवसांपेक्षा बाधितांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तरीही बाधितांची संख्या आवाक्यात असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाच्यावतीने बुधवारी आरटीपीसीआरअंतर्गत २१७ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १२ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९९० जणांच्या तपासणीतून ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नमुन्यांच्या तपासणीपेक्षा पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
जिल्ह्यातील विविध रूग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९४ रुग्णांपैकी ३४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २७ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७४३९
उपचार घेत असलेले १९४
कोरोनामुक्त झालेले ४५५१८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२७
बुधवारी दिवसभरात
सांगली ७
मिरज १
आटपाडी ८
कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, शिराळा, वाळवा प्रत्येकी १
जत, खानापूर, पलूस, मिरज एकही रुग्ण नाही