सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची नियंत्रित संख्या गुरुवारीही कायम राहिली. दिवसभरात २२ जणांना कोराेनाचे निदान होताना १८ जण कोराेनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्यादिवशीही काेरोनाने एकही मृत्यू झालेला नाही.
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. गुरुवारी कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यात एकाही बाधिताची नाेंद झाली नाही.
आरोग्य यंत्रणेच्यावतीने घेण्यात आलेल्या आरटीपीसीआरअंतर्गत २२४ चाचण्यांपैकी ५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ८५५ जणांच्या चाचण्यांतून १९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २१६ रुग्णांपैकी ४४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ३५ जण ऑक्सिजनवर, तर ९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
बेळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७७३३
उपचार घेत असलेले २१६
कोरोनामुक्त झालेले ४५७८२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३५
गुरुवारी दिवसभरात
सांगली १
मिरज १
जत, खानापूर प्रत्येकी ५
आटपाडी, खानापूर, तासगाव, शिराळा प्रत्येकी २
मिरज, वाळवा प्रत्येकी १