कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढविणारी ठरत असून, वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४९ रुग्ण आढळले आहेत. तर महापालिका क्षेत्रात ४८ जण बाधित आढळले आहेत. सांगली शहरासह पलूस, जत आणि मिरज तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत १४२३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १३७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजनच्या १२८२ जणांच्या तपासणीतून १०५ नवीन रुग्ण आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या २०४४ रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १६२ जण ऑक्सिजनवर तर १४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५१६५०
उपचार घेत असलेले २०४४
कोरोनामुक्त झालेेले ४७८०६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८००
बुधवारी दिवसभरात
सांगली २४
मिरज २४
वाळवा ४९
कडेगाव २६
जत २५
खानापूर २२
मिरज तालुका १८
आटपाडी १६
पलुस १३
तासगाव ८
शिराळा ४
कवठेमहांकाळ २