सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी वाढ होताना, २७ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. सोमवारी पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
गेल्या चार दिवसांपासून बाधितांच्या संख्येतील चढ-उतार कायम आहे. सोमवारी यात वाढ होताना २७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. दुपटीने बाधितांची संख्या वाढली असली तरी संख्या मर्यादितच आहे. जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि शिराळा तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. रविवारी जिल्ह्यात एका कोरोना बळीची नोंद झाली असताना, सोमवारी पुन्हा मृत्यूची संख्या निरंक झाल्याने दिलासा मिळाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत २३४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९६९ नमुन्यांच्या तपासणीतून १३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या १७९ रुग्णांपैकी ३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ३२ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सातारा जिल्ह्यातील दोन आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७५३२
उपचार घेत असलेले १७९
कोरोनामुक्त झालेले ४५६२५
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२८
सोमवारी दिवसभरात....
सांगली २
मिरज ३
आटपाडी ११
पलूस ६
तासगाव २
जत, खानापूर, वाळवा प्रत्येकी १