सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आवाक्यात राहताना गुरुवारी नवीन ४९० रुग्ण आढळले. जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू झाला, तर ५४४ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे नवीन दोन रुग्ण आढळून येतानाच एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज १, मिरज तालुक्यातील ४, जत, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी २, कडेगाव, खानापूर, तासगाव, शिराळा आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या ५०४० रुग्णांपैकी ६७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५५७ जण ऑक्सिजनवर, तर १२० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यांतील २४ जण उपचारासाठी दाखल झाले.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ४५३१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २४० जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६५४८ जणांच्या नमुने तपासणीतून २७४ जण पॉझिटिव्ह आढळले.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १८७०५३
उपचार घेत असलेले ५०४०
कोरोनामुक्त झालेले १७७०८४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४९२९
गुरुवारी दिवसभरात
सांगली ६५
मिरज १०
आटपाडी ५३
कडेगाव ५५
खानापूर ३४
पलूस २१
तासगाव ५१
जत २७
कवठेमहांकाळ ५१
मिरज तालुका ६६
शिराळा ५
वाळवा ५२