सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८४३ नवे रुग्ण आढळून येतानाच ८८६ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १८ अशा २१ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसने दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली १, मिरज २, खानापूर, वाळवा तालुक्यात प्रत्येकी ३, आटपाडी, कवठेमहांकाळ प्रत्येकी २, कडेगाव, जत आणि मिरज तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआरअंतर्गत ७६१८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३६२ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७८३० जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ४९४ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या ७३०४ रुग्णांपैकी ९४९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८०२ जण ऑक्सिजनवर तर १४७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला, तर नवीन १३ जण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १७४९७१
उपचार घेत असलेले ७३०४
कोरोनामुक्त झालेले १६३०४६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४६२१
शनिवारी दिवसभरात
सांगली १४९
मिरज १७
आटपाडी ५२
कडेगाव ६२
खानापूर ९८
पलूस ३८
तासगाव १४०
जत ३९
कवठेमहांकाळ ३१
मिरज तालुका ७५
शिराळा १०
वाळवा १३२