सांगली : जिल्ह्यातील कोरोनारुग्णसंख्येत गुरुवारी काहीशी घट होत ९४४ नवे रुग्ण आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाणही घटत ५६६ जण कोरोनामुक्त झाले तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १६ अशा १९ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण आढळला.
जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, कुपवाडा १, तासगाव ४, वाळवा, खानापूर प्रत्येकी ३ तर शिराळा, मिरज तालुक्यात प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत ३३६५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २९० जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ९८३३ जणांच्या नमुने तपासणीतून ६७३ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या ९ हजार ६३४ जणांपैकी ९६१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८११ जण ऑक्सिजनवर तर १५० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा तर १९ जणांचा मृत्यू झाला.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १४६८५०
उपचार घेत असलेले ९६३४
कोराेनामुक्त झालेले १३३१२७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४०८९
पॉझिटिव्हीटी रेट ७.३०
गुरुवारी दिवसभरात
सांगली १२१
मिरज ६५
आटपाडी २५
कडेगाव ८६
खानापूर ५९
पलूस ६२
तासगाव ६०
जत ३५
कवठेमहांकाळ ३६
मिरज तालुका ९१
शिराळा ६८
वाळवा २३६