सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी किंचित वाढ झाली. दिवसभरात ९४९ जणांना निदान झाले. १००१ जण कोरोनामुक्त झाले, तर परजिल्ह्यातील आठजणांसह जिल्ह्यातील १७ अशा २५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, म्युकरमायकोसिसचे नवे २ रुग्ण आढळले.
जिल्ह्यातील मृत्यूचे वाढते सत्र कायम असून बुधवारी १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगलीत २, मिरज तालुक्यात ४ वाळवा ३, खानापूर, पलूस प्रत्येकी २, तर आटपाडी, कडेगाव, जत, तासगावातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत २३१८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३६४ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७८४३ जणांच्या नमुने तपासणीतून ६०६ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या आठ हजार ३४८ जणांपैकी १०२७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ८८३ जण ऑक्सिजनवर, तर १४४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला, तर नवे २१ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १३८८३७
उपचार घेत असलेले ८३४८
कोरोनामुक्त झालेले १२६५४१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३९४८
पॉझिटिव्हिटी रेट ९.५५
बुधवारी दिवसभरात...
सांगली १७६
मिरज ३८
आटपाडी ९
कडेगाव ३५
खानापूर ५७
पलूस ९८
तासगाव ४८
जत ४५
कवठेमहांकाळ ३२
मिरज तालुका १२२
शिराळा ८२
वाळवा २२९