सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढउतार सुरूच आहे. शुक्रवारी बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा घट होत १० जणांना कोरोनाचे निदान झाले तर २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
गुरूवारी एका दिवसात २४ जणांना कोरोनाचे निदान झाले होते. त्यामुळे पुन्हा संख्येत चढउतार कायम राहिला. मिरज शहरासह आटपाडी, मिरज, शिराळा, वाळवा आणि पलूस तालुक्यात एकही नवा रुग्ण शुक्रवारी आढळलेला नाही.
शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरअंतर्गत २१७ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५ जणांना कोरोनाचे निदान झाले तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९२३ चाचण्यांमधून ५ बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यातील सहा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १६२ रुग्णांपैकी ३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ३० जण ऑक्सिजनवर तर ३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित- ४७९८८
उपचार घेत असलेले- १६२
कोरोनामुक्त झालेले- ४६०८१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू- १७४५
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ३
मिरज ०
आटपाडी ०
जत २
कडेगाव २
कवठेमहांकाळ १
खानापूर १
मिरज तालुका ०
पलूस ०
शिराळा ०
तासगाव १
वाळवा ०