सांगली : जिल्ह्यातील नवीन काेरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी पुन्हा एकदा घट झाली असून, ६३१ नवे रुग्ण आढळले आहेत. परजिल्ह्यातील सहाजणांसह जिल्ह्यातील १७ अशा २३ जणांचा मृत्यू झाला तर १,०७५ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसने दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली १, मिरज २, खानापूर ३, कडेगाव, तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, जत, शिराळा आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या ७ हजार ३६९ रुग्णांपैकी ९३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८०२ जण ऑक्सिजनवर तर १३० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत ४,२६० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १६० जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ८,२०५ जणांच्या नमुने तपासणीतून ४८६ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील सहाजणांचा मृत्यू झाला तर नवीन १५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १७३२८२
उपचार घेत असलेले ७३६९
काेराेनामुक्त झालेले १६१३२३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४५९०
गुरुवारी दिवसभरात
सांगली ९२
मिरज २२
आटपाडी ४१
कडेगाव ३३
खानापूर ६०
पलूस ४५
तासगाव ९९
जत ३९
कवठेमहांकाळ ३८
मिरज तालुका ४९
शिराळा ३०
वाळवा ८३