शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus Sangli Updates : जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 10:25 AM

CoronaVirus Sangli Updates : सांगली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढता असला तरी त्याला अटकाव करण्यासाठी लसीकरणही मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. जिल्ह्यात आज अखेर सुमारे 4 लाख 20 हजार नागरिकांना लसिकरण करण्यात आले आहे. यासाठी 377 इतक्या लसिकरण केंद्रावर 2300 इतके अधिकारी / कर्मचारी अव्यहतपणे काम करत आहेत.

ठळक मुद्देकोरोना : जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लसीकरण 377 केंद्रांवर 2300 कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढता असला तरी त्याला अटकाव करण्यासाठी लसीकरणही मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. जिल्ह्यात आज अखेर सुमारे 4 लाख 20 हजार नागरिकांना लसिकरण करण्यात आले आहे. यासाठी 377 इतक्या लसिकरण केंद्रावर 2300 इतके अधिकारी / कर्मचारी अव्यहतपणे काम करत आहेत.सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड -19 चे लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यानंतर दिनांक 01 फेब्रुवारी 2021 पासून फ्रंटलाईन वर्कर यांचे (महसूल, पोलीस, सफाई कामगार व कोविड मध्ये प्रत्यक्ष काम करणारे) लसीकरण सुरु करण्यात आले. दिनांक 1 मार्च 2021 पासू 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तसेच दिनांक 1 एप्रिल 2021 पासू 45 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे.सध्या सांगली जिल्ह्यात 377 लसीकरण केंद्रे सुरु असून याठिकाणी जवळपास 2300 वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच स्वयंसेवक कार्यरत आहेत. आज अखेर 4 लाख 19 हजार 944 लसीकरण करण्यात आलेले आहे. दररोज सरासरी 19 ते 20 हजार लसीकरण होत आहे.247 वॉर रुम सुरु : आज अखेर 1 हजार 940 कॉलजिल्हा परिषद, सांगली येथे वॉर रुम 24 तास कार्यरत असून कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाचे सनियंत्रण येथून केले जाते. तसेच बेड मॅनेजमेंटसाठी वेगळे कॉल सेंटर असून गरजू रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यात येतात. दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पासून बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर सुरु असून आज अखेर 1 हजार 940 कॉल आले असून गेल्या 10 दिवसापासून दररोज 300 कॉल येत आहेत. या कॉल सेंटरवर रुग्णांचे नातेवाईक बेड उपलब्धतेसाठी, शंका निरसनासाठी, कोविड 19 बद्दल माहिती इ.साठी फोन करतात.याबरोबरच गृह अलगीकरण मध्ये असणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा दररोज मिळत असल्याची खात्री करण्यासाठी वेगळी कॉल सेंटर कार्यरत आहे. येथून गृह अलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांना जिल्हा परिषद मधून दररोज कॉल केला जातो व चौकशी केली जाते. या कॉल सेंटरमध्ये जिल्हा परिषदकडील शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.तालुकानिहाय कॉलसेंटर्सची यंत्रणा सज्जविविध कॉलसेंटर्स दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे - बेड मॅनेजमेट कॉल सेंटर झ्र 0233-2374900, 2375900,2377900,2378900,2378800,2377800 गृह अलगीकरण झ्र 0233-2625700, 2622700, 2623300, 2623500, 2623700, 2620100, 2624500, 2622299, 2375400 महापालिका बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर झ्र 0233-2375500, 2374500, तालुकास्तरीय कॉल सेंटर झ्र जत झ्र 02344-247229, आटपाडी झ्र 02343-221717, कडेगाव झ्र 02347-295201, खानापूर झ्र 02347-274001, 276056, क. महांकाळ झ्र 02341-222031, पलूस झ्र 02346-228400, तासगाव झ्र 02346-242328, वाळवा झ्र 02342-224475, शिराळा झ्र 02345-221108या सर्व यंत्रणांचे काम सुरळीतपणे चालावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपलिकेचे आयुक्त नितिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, लसीकरण अधिकारी विवेक पाटील अव्याहतपणे समन्वयाने नियंत्रण करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदSangliसांगली