सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात १११३ जणांना कोरोनाचे निदान होतानाच ७३० जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील १९, अशा २० जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे तीन नवे रुग्ण आढळले.
सरासरी नऊशेवर असलेल्या रुग्णसंख्येत बुधवारी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. गेल्या पंधरवड्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी नोंद झाली. जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगलीचे २, मिरज १, वाळवा ६, शिराळा ४, पलूस २, तर कवठेमहांकाळ तालुक्यात एकाचा मृत्यू झाला.
प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविली असून आरटीपीसीआरअंतर्गत ३७८५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४२१ बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ९९९१ जणांच्या तपासणीतून ७१० जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या ९२७२ रुग्णांपैकी ९७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८२५ जण ऑक्सिजनवर, तर १५२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवे १८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित - १४५९०६
उपचार घेत असलेले ९२७२
कोराेनामुक्त झालेले १३२५६१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४०७३
पॉझिटिव्हिटी रेट ११.१२
बुधवारी दिवसभरात
सांगली १८४
मिरज ६५
आटपाडी ४३
कडेगाव ९७
खानापूर ४४
पलूस ६६
तासगाव १११
जत २९
कवठेमहांकाळ ३१
मिरज तालुका ९८
शिराळा ६०
वाळवा २८५