आष्टा : आष्टा पोलिसांना सॅनिटायझर, मास्क, वाफेचे मशीन, ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनरचे विशाल शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्याताई शिंदे, पोलीस निरीक्षक अजित सिद, दीपक सदामते, विश्वराज शिंदे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील आष्टा पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्राचार्य विशाल शिंदे व विद्याताई शिंदे यांच्यासह विशाल शिंदे युवा मंचच्या वतीने सॅनिटायझर, मास्क, ऑक्सीमीटर, वाफेचे मशीन, थर्मल मशीन, फळे व बिस्किटे यासह विविध साहित्य भेट देण्यात आले.
विद्याताई शिंदे म्हणाल्या, आष्टा शहर व परिसरात कोरोना संसर्ग वाढत आहे. शहरातील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. कोरोना झाल्यास नागरिकांनी जागृत राहून वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, बी. बी. कांबळे, एस. बी. ठाणेकर, सैफ मुजावर, महेश जाधव, विश्वराज शिंदे, रविराज कटारे, शिवराज शिंदे, विलास खोत, उत्कर्ष माने, इरफान जमादार, प्रतीक खोत, दीपक माळी यांच्यासह विशाल शिंदे युवाशक्तीचे सदस्य उपस्थित होते.