सांगली : शिराळा तालुक्यातील निगडी येथील तरुणी व तिचा भाऊ यांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले होते. यापैकी तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्या भावाचा कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आला आहे.
या कुटुंबाशी संबंधित ५ जणांना मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून निकट संपर्क बाधित १४ जणांना शिराळा येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत मिरज येथील आयसोलेशन कक्षात १२ लोक उपचार घेत असून यातील ५ निगडीतील कुटुंबाशी संबंधित आहेत तर ७ जणांमध्ये इस्लामपूर येथील खासगी डॉक्टर व त्यांचा स्टाफ यांचा समावेश आहे.