आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम गावडे म्हणाले, कोरोनाची सौम्य लक्षणे असणारे अनेक रुग्ण घरी राहिल्यामुळे घरातील इतर सदस्यही बाधित होत आहेत. हे टाळण्यासाठी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. येथे डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषधोपचार केला जाणार आहे. तसेच समितीकडून चहा, नाष्टा व दोन वेळेचा सकस आहार देण्यात येणार आहे. हा कक्ष व परिसर दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी प्रफुल्ल माळवदे, विलास चौधरी, डॉ. एम. एच. पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. पूनम चौगुले, एस. एस. मुलाणी, के. बी. कदम, उदयसिंह पाटील, दिग्विजय पाटील, जितेंद्र पाटील, काशिलिंग गावडे, पोलीस पाटील नरेंद्र मधाळे, निवास पाटील, जयदीप गावडे, अरुण गावडे, सनाउल्ला इनामदार, उमेश यादव, सर्फराज इनामदार, उमेश पाटील, करण ठाकूर आदी उपस्थित होते.
फोटो:- शिगाव:
शिगाव (ता. वाळवा) येथे कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करताना निवृत्त डी.वाय.एस.पी. शंकरराव जाधव, डॉ. एम. एच. पाटील, डॉ. दिग्विजय पाटील आदी.