कडेगाव : आमदार मोहनराव कदम यांचे नातू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई व वडील भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
ते भारती हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत, अशी माहिती स्वत: डॉ. जितेश कदम यांनी फेसबुक पेजवरून दिली.गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. जितेश कदम यांनी केले आहे.दोन दिवसांपूर्वी जितेश कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी घेतली असता त्यांची आई आणि वाहन चालक यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, या सर्वांची तब्येत ठीक असल्याचे डॉ. जितेश यांनी सांगितले आहे.माझे बंधू डॉ. हणमंतराव कदम, वहिनी, पुतणे डॉ. जितेश कदम व वाहन चालक हे चौघेही लवकरच कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होतील, असे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे.