सांगली : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाटील हे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सक्रीय होते. तसेच त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची बैठकही त्यांनी घेतली होती. संपर्कातील सर्वच लोकांनी चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.पृथ्वीराज पाटील यांनी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात कोरोनाचा चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना घरीच आयसोलेशन करण्यात आले आहे. पाटील यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या काळात जनतेच्या मदतीसाठी ते सक्रीय होते. शहर व सांगली विधानसभा मतदारसंघातील विविध परिसरात त्यांनी सॅनिटायझर, मास्क वाटप केले. तसेच अर्सेनिक अल्बम गोळ्यांचेही वाटप केले आहे. नुकतेत गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची बैठकही त्यांनी घेतली होती. यापूर्वी काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, नेत्या जयश्रीताई पाटील, डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे.