शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

corona virus : सांगली जिल्ह्यात दोन दिवसात दीड हजार जणांना कोरोना; ४७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 5:26 PM

सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन दिवसात तब्बल १५०३ जणांना नव्याने लागण झाल्याचे दिसून आले असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात दोन दिवसात ५९७ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ५७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात दोन दिवसात दीड हजार जणांना कोरोना; ४७ जणांचा मृत्यूमहापालिका क्षेत्रात ३३३ नवे रुग्ण; दोन दिवसात ५७१ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, दोन दिवसात तब्बल १५०३ जणांना नव्याने लागण झाल्याचे दिसून आले असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात दोन दिवसात ५९७ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ५७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.बुधवारी जिल्ह्यात ७३५ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मिरज येथील ७० वर्षीय वृध्द, ५९ वर्षीय व्यक्ती, ७० वर्षीय, ६३ वर्षीय वृध्दा, हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ७५ वर्षीय वृध्दा, आरेवाडी येथील ८० वर्षीय वृध्द, तानंग (ता. मिरज) येथील ४६ वर्षीय व्यक्ती, बेडग येथील ६० वर्षीय महिला, काकडवाडी येथील ४३ वर्षीय, येळावी (ता. तासगाव) येथील ७९ वर्षीय वृध्द, वासुंबे येथील ६८ वर्षीय वृध्द, जत येथील ४९ वर्षीय, ७० वर्षीय आणि ५५ वर्षीय महिला, कुपवाड येथील ६२ वर्षीय व्यक्ती, सांगली येथील ६७ वर्षीय वृध्द, ७९ वर्षीय वृध्दा, ७५ वर्षीय वृध्दा, निंबवडे (ता. आटपाडी) येथील ७८ वर्षीय वृध्द, आष्टा येथील ५६ वर्षीय, नवेखेड येथील ६५ वर्षीय, कासेगाव येथील ४२ वर्षीय महिला, तसेच शिंगटेवाडी (ता. शिराळा) येथील ७२ वर्षीय वृध्देच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ५४२ झाली आहे.बुधवारी महापालिका क्षेत्रात ३३३ नवे रुग्ण आढळले असून यात सांगलीतील १९०, तर मिरजेतील १४३ जणांचा समावेश आहे. वाळवा तालुक्यात ६८ नवे रुग्ण आढळले असून यात इस्लामपूर, घबकवाडी, नवेखेड, तांदुळवाडी, कारंदवाडी, आष्टा, बागणी, फारणेवाडी, ढवळी, वाळवा, बोरगाव, ताकारी, तांबवे, पेठ, चिकुर्डे, रेठरेहरणाक्ष, बहे येथील रुग्णांचा समावेश आहे.मिरज तालुक्यात ६० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे यात दुधगाव, कसबेडिग्रज, हरिपूर, माधवनगर, बुधगाव, कवलापूर, मालगाव, नांद्रे, सलगरे, म्हैसाळ, कवठेपिरान, भोसे, मौजे डिग्रज, समडोळी, सोनी आदी गावातील रुग्ण आहेत. पलूस तालुक्यात ५२ रुग्ण आढळले आहेत. यात पलूस, कुंडल, बांबवडे, पुणदी, सावंतपूर, रामानंदनगर, बुर्ली, ब्रम्हनाळ, किर्लोस्करवाडी, अंकलखोप येथील रुग्णांचा समावेश आहे. तासगाव तालुक्यात पुणदी, सावळज, कुमठे, मणेराजुरी, कवठेएकंद, वासुंबे, मतकुणकी, अंजनी, खुजगाव, जरंडी, मांजर्डे, बोरगाव येथील ४६ रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली